28 Sept 2015

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी गुगलकडून खास डुडल

   

नरेंद्र मोदींचे गुगलमध्ये स्वागत आहे, असा संदेश गुगलच्या होमपेजवर झळकत आहे



27 Sept 2015

संयुक्त राष्ट्र संघाचा ब्रॉडबॅंड आयोग



* जगातील इंटरनेट वापरणाऱ्यांच्यासंख्येत वाढ होण्याचा वेग मंदावत असून जगाची अर्धी लोकसंख्या अद्यापही इंटरनेटपासून दूर आहे, असा अहवाल या आयोगाने दिला
* जगातील 48 गरीब देशांमधील 90 टक्के जनता इंटरनेटच्या वापरापासून दूर आहे. मागील वर्षी इंटरनेट वापराच्या वाढीचा वेग 8.6 टक्के होता. तो यंदा 8.1 वर येण्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे.
* 2012पर्यंत हा वेग दहा टक्क्यांच्या वर होता. सध्याचा वेग पाहता जगातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या चार अब्जांवर नेण्याचे उद्दिष्ट 2020 पर्यंत पूर्ण होण्याचीशक्यता कमी असल्याचे अहवाल सांगतो. तसेच, इंटरनेटचा वापर करणाऱ्यांपैकी नियमित वापर असणाऱ्यांची संख्याही बरीच कमी आहे.
* सध्या जगातील 43.4 टक्के नागरिकांना इंटरनेटचा वापर करण्याची सोय आहे. संयुक्त राष्ट्र संघाला ही संख्या 60 टक्क्यांपर्यंत न्यायची आहे. गरीब देशांमध्ये पुरुषांपेक्षा 25 टक्के कमी महिलांना इंटरनेटचा वापर करण्याची सोय उपलब्ध आहे.
*जगातील ज्ञात 7,100 भाषांपैकी फक्त पाच टक्के भाषांचेच प्रतिनिधित्व इंटरनेटवर होते.
* सशक्त अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण कमाल पातळीवर पोचले असून, त्यात आताफारशी वाढ होत नसल्याचे ही या अहवालात म्हटले3.2 अब्ज : इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या2.9 अब्ज : 2014 मधील वापरकर्त्यांची संख्या4 अब्ज : अपेक्षित संख्या

संयुक्त राष्ट्र संघाचा स्वस्त महाग शहर आयोग

  

* मुंबई, दिल्ली जगातील स्वस्त शहरं, न्यूयॉर्क महागडं -
* स्विस बँक यूबीएसने जगभरातील 71 शहरांचा तुलनात्मक अभ्यास करून प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार न्यूयॉर्क हेजगातील सर्वात महागडं शहर असल्याचं नमूद केले
* महागड्या शहरांच्या यादीत न्यूयॉर्कपाठोपाठ स्वित्झर्लंडमधील झुरीक आणि जिनेव्हा, नॉर्वेचं ओस्लो, लंडन आणि हाँगकाँग या शहरांचा नंबर लागतो.
* लंडन पाचवं महागडं शहर असल्याने अन्य शहरांच्या तुलनेत येथील राहणीमान परवडणारं नाही. लंडनच्या तुलनेत सिडनी, कोपनहेगन आणि शिकागोमध्ये राहणं स्वस्त आहे.
* स्वस्त शहरांच्या यादीत बल्गेरियातील सोफिया, चेक प्रजासत्तकची राजधानी प्राग, रुमानियातील बुकारेस्ट आणि युक्रेनचं कीव या शहरांचा समावेश आहे.
* राज्यातील ७० टक्केग्रामीण कुटुंबात टीव्ही प्रसारण केबल सेवेद्वारे:-
* ग्रामीण महाराष्ट्रात ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचेकेबल हेच टीव्हीच्या उपभोगाचे माध्यम बनले आहे, असे क्रोम रूरल ट्रॅक या अखिल भारतीय स्वरूपाच्या पाहणीतून पुढे आले
* पंजाब, हरयाणा आणि केरळ या राज्यांतील गावांमध्ये अनुक्रमे ९९.६ टक्के आणि ९९.१ टक्केटीव्ही प्रसारण हे केबलद्वारे आढळून आले* त्याच वेळी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या गावांमध्ये टीव्हीचे प्रसारण हे ६२.४ टक्के डीटीएच माध्यमातून झाले असल्याचे दिसते.